Thursday, December 23, 2010

With The Holiness Of Goddess "Ekweera Devi" GOVINDA TEAM i.e. 
AIROLI KOLIWADA GOVINDA PATHAK Was Established in The Year 2007.
Airoli Gaon is One of The Well Known Place in The Navi Mumbai.
Where All "Aagri & Koli" People Come Together to Celebrate Most of
The Festivals With Full Enthusiasm.

With The Strong Unity & Constant Support of Aagri Koli People The
 "GOVINDA PATHAK" Has Been Started in The Year of 2007. Today "AIROLI KOLIWADA GOVINDA PATHAK" is Found to be an Excellent Team Not Only in The Airoli Village But Also in Whole Navi Mumbai.

"AIROLI KOLIWADA GOVINDA PATHAK" Has Been Registered in Maharashtra State Govinda Pathak and All its Activities are Organized, Arranged & Controlled By 10 Committee Members. The Life Insurance is Also Provided to All The Members for Their Security & Safety Purpose.


Tuesday, November 30, 2010

"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची"

"आई एकविरा देवी" च्या आशिर्वादाने "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची" स्थापना सन २००७ मध्ये करण्यात आली. नवी मुंबई शहरातील नावालौकीक नगर म्हणजेच "ऐरोली गांव". या गावात परंपरेने "आगरी -  कोळी" बांधव एकत्र येउन मोठ्या उत्साहाने सण साजरे करतात.
 
ऐरोली गावातील आगरी -  कोळी बांधवांच्या सहकार्याने व एकजुटीतुनच सन २००७ मध्ये "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची" स्थापना करण्यात आली व सतत गेली ३ वर्षे सातत्याने "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" ऐरोली नगरच नव्हे तर संपूर्ण नवी  मुंबई व ठाण्यात  एक उत्कृष्ट गोविंदा पथक संबोधले गेले आहे.
 
"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" हे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोविंदा पथक असून पथकाचे नियोजन, नियंत्रण आणि जबाबदारी सांभाळण्याकरिता आम्ही १० सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच प्रत्येक वर्षी सभासदांच्या सुरक्षिततेसाठी 'जीवन विमा' काढण्यात येतो.
 
"गोपाळकाला" म्हंटल की मुंबई, ठाणे, नवी मुंबई ईत्यादी उपनगरामध्ये मानवी मनोरे (थर) रचुन गोविंदा पथक आपले कौशल्य लोकांसमोर व आयोजकंसमोर सादर करून पथाकाचा बाल गोपाळ सलामी देऊन अथवा सादर करून "दही हंडी" फ़ोडत आसतो. ज्या प्रकारे "श्री कृष्ण भगवान" हंडी फोडून दही खात असे.
 
"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला" बक्षिस रुपी मिळणारी रक्कम ही ऐरोली गावातील सामाजिक कार्यासाठी व गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. तसेच गोविंदा पथाकासाठी म्हणजेच गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी लागणारे साहित्य व जीवन विमा ह्यासाठी काहीशी जमा रक्कम ठेवून उर्वरित रक्कम गावातील मंदिरे, समाजमंदिर, संस्कृतिकभवन ह्यांच्या साठी राखून ठेवली जाते.
 
"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक" ह्यामध्ये ऐरोली गावातील लहनानपासुन ते प्रौढांपर्यँत सर्वजण एकत्र जमा होउन सतत १ महिन्यापासून गोविंदा पथाकाचा सराव करण्याकरिता जमा होतात. आणि "गोपळकाल्याच्या" दिवशी प्रत्येकजण पथाकाचा सदस्य म्हणुन पथकाने दिलेला गणवेश परिधान करून "गावदेवी मंदिरात" आईचा आशीर्वाद घेऊन गोपालकाला खेळायला निघतात.
 
आमच्या "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाच्या" माध्यमातून ऐरोली गावाच्या विकासासाठी, सामाजिक कार्यासाठी, मदत व्हावी यासाठी एकच मानस करीत आहोत की या पुढे गावातील लोकांमध्ये एक्याची भावना वाढीस लागावी या साथी आम्ही प्रयत्नशील असू. या साठी आम्ही एकच संकल्प करीत आहोत की ऐरोली गावातील सण उत्सव सर्वानी एकत्र येउन साजरे करण्याचा. तसेच प्रतेकाच्या सुखः दुखाःत सहभागी होवून सामाजिक समतोल आणि सामाजिक बांधिलकी राखण्याचा आमचा प्रयत्न राहिल. आणि तो संकल्प तडीस नेण्यासाठी "आई एकवीरा" आम्हास बळ देवो, ही "आई एकवीरा" चरणी प्रार्थना.